Performing ‘Now’

As I sit down to write the editorial for हाकारा। hākārā’s current edition, a recent incident at Bhima Koregaon in Maharashtra and its aftermath hovers over us. Bhima Koregaon obelisk was brought to the forefront once again with violent acts of caste conflict at the dawn of the new year.  It revealed the complex nature of contemporary politics focusing on entrenched caste discriminations, discourse on nationalism, and identity politics that is deeply rooted and is constantly being re-invoked in present times. One way of doing it is by using cultural symbols, icons and narratives to intensify these rhetorics. Although, my concern here is not if it is a myth or alternate historical narrative or whether the using of the myth/story is productive or counterproductive. Rather, what I would like to ponder upon is how do we perceive it today, 200 years after the actual battle and almost a century after construction of the event as an action against caste oppression. What kind of role does the victory obelisk play in this very moment, in constructing our ‘now’? What role does ‘now’ play in the creative construction of history or in challenging cultural supremacy by using such prominent symbolism or gestures? Does it register its presence in a performative mode that invites volatile identitarian tendencies or does it allow dalits to assert themselves in contemporary times?

Through such actions, the performative comes live through the temporal and ephemeral as it reveals itself in the present. It enacts and engages bodies across time and through memory.  This remembering manifests in documents and re-enactments which probably makes it ‘live’ or a thing in the present. In a way, it reestablishes the vulnerability of the socially and culturally engraved body but at the same time, radically interrogates modes of present structures, be it art or society, contemplating the present, the now. Though it is time adjacent to the present moment, ‘now’ requires historical explanation and a more external perspective. Here, it becomes our reality, either objective or constructed, but it does exist. It is laden with alienation, ugliness, fragmentation but also with belonging, re-interpretation and impermanency. As one realises that the ‘now’ is constructed by memories, emotions and aspirations, somehow, it almost becomes a performance of the past experiences. These experiences shape one’s beliefs that then affect one’s construct of their reality in the present moment, for example, through practices of history writing and myth making.





Another aspect of the performative in the context of our discussion on ‘now’ lies in its connection with the contemporary. It fuses time, spaces, and also realities around us. In the contemporary, the boundaries of time collapse as it is always ongoing, no sensation is the same as the previous sensation, the past lives on inside the present. The idea of performance or live art goes closer to the concept of ‘now’ where the subtle gestures, movements, or actions in a certain temporal moment and space generate meanings and provocations. An interesting example is Samuha Suresh’s walk to locate scribbling and marks by workers and inhabitants inside and under the flyovers in Bengaluru. He curated a walk-through at night where he carried a torch to show the scribbling and markings at one of the construction sites acknowledging the presence of migrant labourers while discovering drawings, texts, and stories of temporary inhabitants on the pillars and walls that create contemporary cities. The partially visible layers of histories and markings of the otherwise invisible or marginalized voices and images become evident through performative gestures in the ongoing discourse on contemporary art.

If we consider history as a creative act, then one would understand it through performative re-enactments. We realise that ‘now’ does not exist independently or by itself. The re-creation of our past moments and future imaginations conflate, preserve or disrupt its temporal and spatial groundings. Does the ‘now’ become a baggage of the past and the future? In the context of हाकारा। hākārā’s current edition, the politics of ‘now’ gets reflected in various pieces, especially Ramu Ramanathan’s play Comrade Kumbhakarna and Rashmi Sawhney’s critical essay on intersections of history, cinematic time and present moment. Located in the ongoing right-wing discourse on caste and religion, these two critical pieces unfold the layers of aspirations, conflicts, and social structures in completely two different contexts. They shape social interaction, create belief systems and social fictions that claim to be objective realities. Any alternative idea or construct ruffles these so-called ‘realities’ or ‘facts’. It becomes an all pervasive moment that swallows down everything including identities, politics, culture, language and history.

The immediacy of creating and maintaining certain dominant narratives of history in a way shape our identity and cultural ethos. Kumbhakarna, a young boy from a nomadic performing group whose name resembles a character from Ramayana, questions the mainstream version of Ramayana while claiming his own place in the historical narrative. The story keeps moving between the past and the present with reference to Ambedkar and Periyar and contemporary politics of the marginalized groups with their entangled relationship with the violent past of caste hierarchies. Here, ‘now’ becomes a site for subversive acts of re-telling the stories, reconstructing historical narratives according to their own politics. Rashmi Sawhney’s essay looks at the simultaneity of mythical, historical and technological times in cinema where a mythological character of Padmavati gets ‘historicised’ to reinforce the compelling historical narrative. It critically investigates the role of cinema in re-interpretation and valorisation of history in the midst of present-day aggressive religious biases that have implications on the unfolding of current socio-cultural and political scenario.

For Marathi editorial, please click here.  


 
Image courtesy for the editorial: Lamula and Punit Paranjape


The editorial was first published in हाकारा । hākārā: an online bilingual journal of creative expression published in English and Marathi in January 2018. Visit www.hakara.in.

नाट्यावकाशातील समकालीनतेचे अन्वयार्थ




कलेच्या क्षेत्रात समकालीनतेचा विचार करताना समकालीन नाटक आणि तेही महाराष्ट्रात घडणारं समकालीन नाटक काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. समकालीनतेच्या बहुपेडी व्याख्येत चपखल बसणारं आणि समकालीनतेच्या प्रयोगशीलतेला आपलसं करणारं अलिकडच्या काळातलं लिखाण म्हणजे आशुतोष पोतदार यांची नाटके. त्यांच्या लिखाणातून ते त्यांच्या भवतालाला भिडतात, सामाजिक सांस्कृतिक भान बाळगत प्रत्ययकारी नाटकांच्या संहिता त्यांनी गेल्या दहा वर्षात मराठी नाटकाचे वाचक, अभ्यासक आणि प्रेक्षकांना दिल्या आहेत. 'वॉटरमार्कपब्लिकेशन'ने प्रकाशित केलेल्या आशुतोषपोतदार यांच्या चार नाटकांच्या दोन संग्रहात संहिता एकत्रितपणे वाचायला मिळाल्यामुळे त्यांच्यातले काही समांतर धागे व लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेतील चिंतनाचे विषय समजून घ्यायला तर मदत होतेच पण या संग्रहामुळे त्यांच्या लिखाणातील वैशिष्ट्यांचाही सापेक्षतेने विचार करता येतो. या लेखाच्या सुरूवातीला मला प्रमाणिकपणे नमूद करावंसं वाटतं की या दोन पुस्तकात छापलेल्या चार नाटकांपैकी केवळ 'F1/105' या एका नाटकाचे सादरीकरण मी प्रत्यक्षात पाहिले आहे आणि त्याबद्दल या आधी विस्ताराने इतरत्र लिहिलेदेखील आहे. या टिपणात प्रत्यक्ष सादरीकरण व त्याचे विवेचन हे मुद्दे यात विचारात न घेता मी या नाटकांचा मुख्यतः संहिता म्हणून विचार केला आहे. या पुस्तक द्वयीतला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संहितांसोबत दिलेली नाटकांची परीक्षणे. नाटकांच्या प्रयोगांनंतर निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झालेली ही टिपणे या पुस्तकात एकत्रितरित्या वाचकांना वाचायला मिळतात आणि नाटकांच्या संहितांकडे पाहायचा एक दृष्टिकोन मिळण्यास मदत होते.

कसबा सांगाव, कोल्हापूर, बंगलुरू आणि पुणे अशा लेखकाच्या व्यक्तिगत प्रवासातून घडणारं असलं तरी नाटकीय काळाच्या संदर्भात ते एकरेषीय असत नाही. अनुभव वा आठवणींच्या पातळीवर ते प्रतिमारूपात आपल्या समोर उभं राहातं. त्यातून तयार झालेल्या समकालीन संवेदना, त्यातले पदर व त्या पदरांच्या घड्या एकमेकांवर येत राहातात. या संहिता वाचताना एकीकडे फॉर्मच्या प्रयोगातून रूपबंधाचं भान दिसून येतं, तर त्याचबरोबर आशयातून संदर्भचौकट स्पष्ट होत जाते. ‘पुलाखालचा बोंबल्या मारूती' मधलं मुख्य पात्र माया म्हणते, “निर्मितीप्रक्रिया भवतालातूनच आकारते.” हे अर्थात आपल्याला माहिती असलं तरी ते खऱ्या अर्थानं आशुतोषच्या नाट्यलेखन प्रक्रियेत घडताना दिसतं. एका अभ्यासकाच्या वृत्तीतून घडणारं हे लिखाण कला, संस्कृती, इतिहास, भाषा, सामाजिक आणि राजकीय मीमांसा असे अनेकविध पदर ही त्यांच्या लिखाणाची बलस्थाने ठरतात. मेट्रोपॉलिटन शहरांतून राहाणाऱ्या, वावरणाऱ्या समाजाच्या निरनिराळ्या स्तरातल्या, समुदायाच्या माणसांचे जगणे, त्यातले तणाव व विसंगती, शोषणाच्या व्यवस्था, मोकळीकीच्या रचना, आणि या साऱ्यातून लागत जाणारे अन्वयार्थ हे या नाटकांची पार्श्वभूमी ठरतात. या संहिता व त्यातील पात्रे या मार्फत नाटककार जातीपासून, भाषेपर्यंत, विकासाच्या प्रकल्पापासून उपभोगवादापर्यंत, परंपरेपासून समकालीनतेपर्यंत अनेक विषयांचा उहापोह करतात.



आधुनिकतेच्या भव्यदिव्य उभारलेल्या देखाव्यात एेतिहासिक संदर्भ, ओळखी, मानवी संबंध यांच्या पलीकडे जाऊन सुपरहायवे किंवा मॉलसारख्या 'न-जागा' (नॉन-प्लेसेस, मार्क ओजे १९९५) आधुनिक, संपन्न जगण्याचा आणि विकासाचा आभास निर्माण करतात. प्रचंड वेगाने जाणाऱ्या गाड्यातून ना वाटेतले रस्ते कळतात, ना गावं ना त्यांच्या खाणाखुणा किंवा चकचकीत मॉलच्या बंदीस्त भिंतीत ना काळाचे भान राहाते ना भवतालात घडणाऱ्या घडामोडींचे. अशा 'न-जागा' या एकप्रकारचे तुटलेपण तयार करण्यात हातभार लावतात. कोणत्याही प्रकारच्या मानवी संवादारहित असा हा व्यवहार चालत राहू शकतो किंवा असला तरी तो तात्पुरत्या आणि 'कंत्राटी' पद्धतीचा असू शकतो. अशा प्रतीकांच्या वापरातून आत्ताच्या परिस्थितीत सतत आजूबाजूला जाणवणारं एक प्रकारचं विखुरलेपण मात्र केवळ संवादातून नव्हे तर नाटकीय रूपरचनेतून देखील सशक्तपणे उजागर केले गेलेले दिसते. 'पुलाखालचा बोंबल्या मारूती' मध्ये गावातले काही आणि बाहेरून आलेल्यांचा रेसिडन्सीमधला एकत्रितरित्या सहभाग, कला आणि भवतालाचं नातं, जागतिकीकरणानंतर बदलेली विकासाची मॉडेल्स, वेगाने वाढलेली शहरं, गावातल्या शेती आणि शिक्षणापासूनचे अनेक प्रश्न, शहरी मध्यमवर्गाच्या आणि ग्रामीण लोकांच्या बदलत्या आकांक्षा यावरच्या तपशीलवार संवादातून हे विखुरलेपण, तुटलेपणाच्या जाणिवा सजगपणे पुढे आणल्या आहेत. समकालीनता शहरी-ग्रामीण, स्त्री - पुरूष यासारख्या द्वैतांच्या पलीकडे जाते किंवा त्यांना कवेत घेते. गावात चालू असलेल्या आर्ट रेसिडेन्सीतल्या कलाकारांच्या अॅक्टीविटीज मधून परंपरेबद्दलची चर्चा इथे एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीतल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने घडते. त्यात गतकाळाला सतत सामोरं जाण्याची प्रक्रिया यांच्या लेखनात अधोरेखित होते. मात्र इतर संहितांपेक्षा अधिक चर्चात्मकतेकडे झुकते व थेटपणाने काही मुद्दे मांडते. शहरीकरणाची प्रक्रिया आणि बदलती गावकुसं याकडे ते लक्ष वेधते. पण गाव नावाच्या गोष्टीकडे एक्झॉटिक व रम्यपणाच्या कल्पनातून बघणं, टोकाच्या दृष्टीकोनातून शहर व गाव असं द्वैत मांडणं याकडे लेखक मात्र चिकित्सकपणे बघतात. त्या ध्रुवीकरणात न अडकता त्यातली गुंतागुंत गावात येऊ घातलेल्या 'सुपरहायवे'च्या आणि त्यामुळे 'विस्थापित' होणाऱ्या बोंबल्या मारूतीच्या प्रतीकातून हाताळतात. जातीच्या उतरंडीबद्दलची चर्चा नंतरच्या टप्प्यावर येते पण सुरूवातीला स्थानिक कलेच्या उल्लेखा दरम्यान मात्र केवळ परंपरा आणि समकालीन कलाविष्काराच्या पद्धती यांच्यातल्या तणावापुरते रेसिडन्सीतल्या कलाकारांचे संवाद घडतात. त्या दोन्हीमध्ये अस्तित्वात असलेले द्वंद्वात्मक नाते मात्र नाटकाच्या ओघात बाजूला पडते. येणाऱ्या बदलाचा स्वीकार करायचा की त्याला नकार द्यायचा हे पर्याय उरतात पण त्यातून वेगळ्या पर्यायाची, अधिक सजग, समतोल साधणाऱ्या बदलाच्या पर्यायासाठीचं अवकाश अशा प्रकारच्या लेखनातून तयार होण्याच्या शक्यता आपण आजमावू शकतो का, असा प्रश्न उरतो.

आज सार्वजनिक आणि खाजगी अवकाशातला फरक धुसर होत जात असताना त्याचं प्रत्यंतर आशुतोषच्या संहितातून प्रखरपणे समोर येते. नाटकीय अवकाशाचा विचार करता 'F1/105' आणि 'आनंदभोग मॉल' ही दोन्ही नाटके मुख्यतः घराच्या खाजगी अवकाशात पार पडतात. अर्थात, हे होत असताना सार्वजनिक अवकाशातल्या घटना, सामाजिक उतरंडी, जात आणि धर्माचं राजकारण या सारख्या आपल्याला जखडून टाकणाऱ्या अनेक गोष्टी या जोडप्यांच्या खाजगी अवकाशात प्रवेश करतात. त्यांचे नातेसंबंध, विश्वास, विचार, त्यांच्या जगण्याची तत्त्वं, सवयी साऱ्यांचीच यात घुसळण होत राहाते. पण ते माणसांच्या मनोवृत्ती किंवा मानसिक आंदोलने या परीघात फिरत राहात नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'आनंदभोग मॉल' हे त्यांचं रंगमंचीय अवकाशात उभं राहिलेलं पहिलं नाटक. यातलं आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं त्यांच्या जाती अस्मिता विसरू शकत नाही. त्या विसंवादी जगण्यात आणि भांडणात पुन्हा पुन्हा त्यांची जात डोकं वर काढत राहाते. ब्राह्मण आणि मराठा या समाजातल्या दोन उच्च जातीय समूहांचं प्रितिनिधित्व करणारी ही पात्रं आधुनिक समाजात वावरताना जात गळून पडावी लागते याची जाणीव असतानाही त्यांच्या परंपरांचे दाखले देत राहातात, जातीवरून एकमेकांची उणीदुणी काढत राहातात, कामाच्या ठिकाणच्या जातीय राजकारणाने अस्वस्थ होत आपापल्या जातीला घट्ट धरून ठेवू पाहातात. त्यांना मूल न होणं हे जातीभेदाच्या पालिकडंच सत्य दाखवणारं प्रतीक असू शकतं तसंच ते त्यांच्यातल्या खुंटलेल्या नवनिर्मितीच्या जाणिवा वा क्षमता यांचं प्रतीकही असू शकतं. या अस्थिरतेच्या वातावरणात दोघंही त्यांचं मनःस्वास्थ्य इतरत्र शोधत राहातात. बाहेरच्या जगात तीव्र होत जाणाऱ्या जातीय अस्मिता, त्यात येत जाणारी कट्टरता, आधुनिकतेनं पूर्ण न केलेली वचन, जागतिकीकरणाच्या रेट्यात उफाळून वर येणारे जातीचे आणि धार्मिक अस्मितांचे प्रश्न हे सगळं या जोडप्याच्या संवादातून आपल्या पुढे उभं राहातं. या सगळ्यापासून दूर जाताना ते संभ्रमित अवस्थेत जातात. यात स्वप्नाळूपणातून त्यांचा नव्या जगाच्या निर्मितीची नव्हे तर अधिक गुंतागुंतीच्या शोषण व्यवस्थेचं प्रतीक असलेल्या मॉलच्या बांधणीकडे ते वळतात. प्रस्थापित मध्यमवर्गीय जाणिवांना छेद देणारी, त्यातले ताणे बाणे दाखवणारी व त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची चिकित्सा करणारी ही संहिता समीक्षेच्या दृष्टीकोनातून उजवी ठरते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाषेचा. या चारही संहितांचं आकलन करताना नाटकीय अवकाशासह समकालीन भाषा समाजात काय प्रकारे काम करत असते, याचा विचार लेखकाने मांडलेला आहे. केवळ मौखिक वा संवादातील भाषा नाही तर दृश्य-अदृश्य आणि संहितांचे पदर उलगडत जाताना समजत जाणारी, आकाराला येणारी भाषा, या सर्व पातळीवर भाषेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आशुतोषच्या नाटकातील भाषा ही एका विशिष्ट भाषिक समुदायापुरती मर्यादित न राहाता ती अधिक सार्वत्रिक रूप धारण करते. मराठी नाटकांना सवयीच्या असलेल्या भाषेपेक्षा वेगळी, शहरी वापरातली, बहुभाषिक समुदायांची, आंतरजालीय समाजमाध्यमातून तयार होत गेलेली ही संमिश्र भाषा सहजतेने त्यांची पात्रं बोलतात. 'सिंधु, सुधाकर..’ या संहितेत अलंकारिक ते आजची बोलीभाषा अशी ही तफावत प्रकर्षाने जाणवते. शंभर वर्षाच्या फरकाने झालेले भाषिक अभिव्यक्तीचे बदल, फक्त भाषेपुरते मर्यादित न राहाता जीवनशैली आणि बदलत्या सामाजिक व नातेसंबंधांच्या बदलाला देखील अधोरेखित करतात. 'F1/105' या दीर्घांकात अनेक भाषांची सरमिसळ होत जाते. निरनिराळी पात्रं निरनिराळ्या भाषिक अस्मिता जपत त्यांच्या भवतालाशी जोडून घेतात. पण त्याचबरोबर, तीच भाषा त्या भवतालात निर्माण होणाऱ्या संघर्षालाही कारणीभूत ठरते. मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि अगदी तंजावरी मराठीचा वापरही यातली पात्रं सहजपणे करतात. मोठ्या शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात जगणाऱ्या या पात्रांची त्यांची भाषा ही ओळख ठरते. भाषेच्या वापरावरून त्यांची ओळख, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे स्वभाव हे नुसते ठरत जातात इतकंच नाही तर त्यातून काही वेळा आपल्या साचेबंद समजांना पुष्टीही मिळते. 'आनंदभोग मॉल' मधील भाषेचा बाज हा मिश्र आहे. शहाण्णवकुळी मराठा असलेला आणि गावाकडून शहरात आलेला पण बहुतेकवेळा प्रमाण मराठी भाषेत बोलणारा 'तो' अचानक मध्येच ग्रामीण ढंगातल्या मराठीकडे वळतो. क्वचित पण 'ती' देखील ग्रामीण ढंगात बोलून जाते. पेशाने डॉक्टर असलेला 'उच्चकुलीन' मराठा 'तो' आणि ब्राह्मण असलेली 'ती' असे दोघेही उच्चविद्याविभूषित असलेल्या त्यांच्या भाषेतला हा गोंधळ वाचकालाही जरासा गोंधळात टाकतो.




लेखकाचा नाटक, त्याचा इतिहास आणि नाटकांची अर्काईव्स यातला अभ्यास व संशोधन यातूनही लेखन प्रक्रिया आकाराला येताना दिसते. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर' ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला'चे समकालीन दृष्टीकोनातून मांडणी करते. शीर्षक सुचवते त्याप्रमाणे ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या शतकभरापूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकावर आधारित आहे. हे नाटक घडत 'एकच प्याला'वर बनत असलेल्या चित्रपटासाठी रंगपट तयार करणाऱ्या डिझाईन स्टुडिओमध्ये. गतकाळातली ही कथा आजच्या काळात घुसत जाते, काळाच्या सीमा उल्लंघत वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळ होत जाते. मूळ संहितेतल्या अतिरंजित घटना व संवाद आणि आज चालू असलेल्या डिझाईन स्टुडिओतल्या घटना या मागे पुढे येत राहातात, बेमालूमपणे एकमेकात मिसळत राहातात. सुरूवातीला वेगळी असलेली ही काळाची प्रतलं नाटकाच्या शेवटाकडे एकमेकातून वेगळी काढणं अवघड होत जातं. अर्थात, 'एकच प्याला'च्या संहितेतले संवाद केवळ स्मृतीरंजनादाखल पेरलेले नाहीत तर त्यातून आजच्या संदर्भातले मानवी नाती, सामाजिक उतरंडी, लिंगभाव सारखे मुद्दे ध्वनित होत राहातात. रमा आणि अॅपल कॉश्च्युम ठरवताना त्या काळाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात पण ते करताना त्या मूळ नाटकातल्या पात्रांमध्ये खोलवर रूतत जातात. इतकं की ते त्या पात्रांकडे सहानुभूतीने आणि कधी चिकित्सक दृष्टीकोनातून पाहात राहातात. काळाच्या खेळाच्या पलीकडे जाऊन समकालीनतेचे संभाषित साकारणारे लिंगभाव, बदलत्या लग्न व्यवस्थेवरचं भाष्य आणि लिंगभावातील प्रवाहीपणा हे मुद्दे त्या निमित्ताने चर्चिले जातात. सिंधु, सुधाकर यांच्या संवादातून, रघू आणि अॅपलच्या नातेसंबंधातून, गीताच्या स्वगतातून किंवा अॅपलच्या एकाचवेळी तळीराम व सिंधुच्या पात्रात शिरताना मॅनेक्विनबरोबरच्या प्रसंगातून हे मुद्दे विविध पद्धतीने अधोरेखित होताना दिसतात.

मराठीतील शोकांतिका मानली गेलेली ही संहिता मूळ नाटकाचा आजच्या संदर्भात अर्थ तर लावतेच पण त्या प्रकियेतून काही तथ्य आणि संदर्भ यांना एकत्र आणत वाचकांना एका परीने संहितेतील आजवर अस्पर्श असलेले मुद्दे व अर्थ यांना परिचित करते. F 1/105 आणि आनंदभोग मॉल मधली जातीय व भाषिक पार्श्वभूमीतून पात्रं असली तरी 'सिंधु, सुधाकर..’ मधली पात्रं ही अशी कोणतीही लेबलं घेऊन येत नाहीत. ती केवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्री पुरूष म्हणून आपल्या समोर येतात. त्यांच्या 'ओळखीच्या' गुंतागुंती या केवळ लिंगभावापुरत्या मर्यादित राहतात. कपडे बदलून ती पात्रं आपली 'ओळखी'ची अदलाबदल करतात, काळाच्या सीमा ओलांडतात. यात इतिहास, वारसा, परंपरा, वर्तमान अशा अनेक प्रकारे गुंतागुंतीच्या रचना व त्यातले बारकावे ही संहिता मांडते. या संहितेचं वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाटककार केंद्रीत रचनेतून बाहेर पडत त्या भोवतालच्या एेतिहासिक, सामाजिक घडामोडी, भाषा, सौंदर्यशास्त्रीय कल्पना यांची गुंफण यात केलेली दिसते. त्या पण ते करताना मूळ संहिता व त्याच्या बांधणीतून पुन्हा नाटककार केंद्रीत प्रक्रिया यात ते अडकते. गडकरींचे नाटक व त्याचे पुनर्वाचन या पठडीत विचार केल्याने इतर संदर्भांना गौण स्थान मिळते की काय असेही वाटते. शिवाय, त्यातल्या व्यापक जीवनदृष्टी लक्षात घेऊनही गडकरी यांचे मध्यमवर्गीय चौकटीतले नाटक का विचारात घ्यावेसे वाटते, हा मूलभूत प्रश्न उरतो.

हा प्रश्न विचारताना हे मात्र जरूर नमूद करायला हवे की निम्नजन किंवा 'इतर' आशुतोषच्या लेखनातील महत्त्वाचा अवकाश व्यापतात. ते 'बळी' स्वरूपात न येता सबल पात्रे म्हणून आपल्यासमोर येतात आणि भौतिक परिस्थितीने निर्माण केलेले त्यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध आणि सामाजिक आंतर्विरोध हाही सखोलपणे मांडला गेलेला दिसतो. ‘सिंधु, सुधाकर...’मधल्या शिवाच्या तोंडी वाक्य आहे: “इतिहास फक्त वर्तमानच फिरतो.” मला वाटतं, आशुतोष यांच्या लिखाणात इतिहास आणि परंपरेचं हे असं वर्तमानात फिरणं, गोते खाणं आणि वर्तमान संदर्भांना स्पष्टपणे समोर आणणं हे त्यांच्या सर्वच नाटकांतला एक समान धागा म्हणून पाहाता येतो. या प्रक्रियेत अनेक संदर्भ एकत्रित व विलगपणे गुंफलेले दिसतात. ही गुंफण उलगडण्यात वाचकांची कसोटी लागते तर कधी कधी ते केवळ उल्लेखापुरते येऊन जाते, असेही वाटते. त्यामुळेच आधुनिकतेच्या प्रक्रियेकडे चिकित्सक नजरेने पाहाताना अधिक खोलात जाऊन या वास्तवाचा शोध घेता येतो का, त्यातल्या अंतःप्रवाहांचा आवाका यातून खणून काढता येतो का आणि या साऱ्या विसंगतीच्या पोटात दडलेल्या द्वंद्वात्मकतेची जाणीव सखोलपणे उतरू शकते का, याचा विचार गरजेचा ठरतो. आणखी एक सामाईक गोष्ट जाणवते ती म्हणजे या संहितांचा शेवट. संहितांच्या शेवटाला ठराविक दिशा न देता ते खुले ठेवण्याची जोखीम आशुतोष पत्करतात. यातून वाचकांना कल्पकतेची व अर्थघटनाची मुभा मिळते पण लेखकाची भूमिका बऱ्याचदा अस्पष्ट अथवा संदिग्ध राहाते. जातीचा इतिहास, धर्माचा इतिहास, रंग, स्पर्श, भाषा यांचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर या पात्रांतून व नाट्य अवकाशातून उभा ठाकतो. पण हे करताना राजकीय – सामाजिक परिप्रेक्ष्यातून धूसर रेषेवर ही नाटके आणून सोडतात. याखेरीज, मराठी नाट्यक्षेत्रात मूलभूत कलात्मक लिखाणाची व त्यातील फॉर्ममधल्या प्रयोगशीलतेची वानवा असताना ही पुस्तक द्वयी आशुतोष पोतदार यांचे लिखाण मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात मोलाची भूमिका बजावते.


लेखक: आशुतोष पोतदार
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन, पुणे
आनंदभोग मॉल आणि पुलाखालचा बोंबल्या मारूती
पाने: ११२ | मूल्य: १६०
F1/105 आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर
पाने: १३६ | मूल्य: १६०

पूर्व प्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, १-१५ एप्रिल, २०१८

'हाकारा' कशासाठी? / Why 'Hakara'?

मे २०१७ मध्ये पहिली आवृत्ती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो तेव्हापासून 'हाकारा' का? हा प्रश्न अनेक वेळा आम्हाला विचारला गेला. 'हाकारा'ची कल्पना प्रत्यक्ष आकार घेऊ लागल्यापासून ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. कला, साहित्य आणि सामाजिक-सांस्कृतिक भान या सगळ्याला एकत्र बांधणारं, त्यावर चर्चा घडवून आणणारं एक अवकाश असावं, या विचारातून 'हाकारा'ला सुरूवात झाली. यावर विचार करताना, त्याला शब्दरूप देताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज असं अवकाश मर्यादित रूपात  आपल्याला दिसतं.  त्याची व्याप्ती आणि खोली वाढवायची असेल तर त्यावर नव्याने लिखाण, चर्चा आणि चिकित्सा व्हायला हवी. त्याच्या  कक्षा रुंदावायच्या असतील तर माध्यम पण ते अवकाश सामावणारे हवे आणि सहजपणे वाचक अभ्यासकांपर्यंत पोचवण्यासाठी उपलब्ध असणारं  हवं. त्यामुळेच  नवमाध्यम त्याच्या लवचिकतेमुळे माध्यमाचे आणि आरेखनाचे प्रयोग करायला उपयोगी ठरलंय. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा द्वैभाषिकतेचा. मराठी आणि इंग्रजी भाषेत घडणारी मांडणी, विचारमंथन आणि देवाणघेवाण यातून समृद्ध चर्चाविश्व कसं आकाराला येईल, त्याकरिता कोणती नवी माध्यमे आणि घाट वापरता येतील यावर सातत्याने संवाद घडत राहावा, यासाठी हा 'हाकारा'चा पार.


Snehal Goyal, Before I lose them forever (Edition 01: Memory II)







 
K.G. Subramanyan, Santhal Letters, Asia Art Archive collection (Edition 01: Memory II)


'हाकारा'चं रसायन हे जर्नल किंवा नियतकालिक आणि  दृश्यात्मकता व त्यातली सौंदर्यदृष्टी यांच्या मिश्रणातून तयार होत आहे. प्रत्येक आवृत्ती ही नव्या विषयाला धरून त्या भोवती रचलेल्या कथा, कविता, चित्रं, मुलाखती, लेख यासारख्या निरनिराळ्या रचनाप्रकारातून आकार घेते. 'आठवण' मध्ये हिंसेच्या अनुभवाच्या कैफियतीपासून साध्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांना उजाळा मिळतो. 'आतलं, बाहेरचं, अधलं-मधलं' मध्ये गुंतागुंतीच्या आणि असंख्य पदर असलेल्या जगण्याच्या, कलाव्यवहाराच्या, सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक पैलूंवर मांडणी केली आहे. ही मांडणी करणारे कवी, चित्रकार, छायाचित्रकारांपासून इतिहासकार, कथाकार, नाटककार आणि शास्त्रज्ञ आहेत. एकाच विषयाच्या अनेक बाजू, अनेकविध दृष्टीकोन त्या विषयाबद्दलच कुतूहल जागवतात, जागं ठेवतात. त्याचे निरनिराळे पैलू आपल्यासमोर आणतात. यातून 'हाकारा'तील मांडणी ही ठरावीक पद्धतीच्या अभिव्यक्तीच्या किंवा कलाविष्काराच्या रूपांना धडका देत त्यांचा परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानिमित्ताने आम्ही मांडलेली 'हाकारा'ची भूमिका:

हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;

a call, a general or a great and continued calling


‘हाकारा’ या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपण आणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे. जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणि कोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्या आणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्य माध्यमातून ‘हाकारा’च्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे. काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असते तर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रितीने गुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धुसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणि तिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशा अभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणि चिकित्सक प्रक्रिया ‘हाकारा’चा गाभा असेल.

‘हाकारा’च्या पारावरून बोलावण्यामागं लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चा घडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचं विश्लेषण इथं केलं जाईल. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्वाचं ठरतं तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड मोलाची ठरेल.

‘हाकारा’चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती, दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

हाकारा'ची येती आवृत्ती आता/Now  या विषयाभोवती गुंफलेली आहे. आपल्या कलाकृती/लिखाण पाठविण्यासाठी पाहा: http://www.hakara.in/appeal-call-3/

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā


Current edition


Our contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. With hākārā, our aim is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, we’ll focus on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.
In keeping with this focus, hākārā will be published online in freely accessible and interactive format by focusing on the area that may help us address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures.

The hākārā editors would be interested in the sharing of research, speculations, literary and visual work presented innovative ways that responds to current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society. We particularly encourage innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.

To submit your work for our forthcoming edition on आता/Now , please see our Next Call here: http://www.hakara.in/appeal-call-3/

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā.