आधुनिक
कलेच्या संदर्भात बघायचं
झालं तर विसाव्या शतकाच्या
सुरुवातीच्या काळात बंगाल
मधील काही कलाकारांनी 'बंगाल
रिवायवलिजम'
– भारतीय
कलेचे पुनरुज्जीविकरण करण्यावर
जॊर दिला.
ब्रिटिशांनी
सुरु कॆलॆल्या कला शाळा आणि
कला शिक्षणातून आलेल्या
अकादमीक वास्तववादाला किंवा
निसर्गवादाला तसेच तैलरंगाच्या
वापराला त्यांनी विरोध कॆला.
भारतीय
कला काय आणि कशी असॆल याचा
ऊहापॊह करताना अबनींद्रनाथ
ठाकूर,
नंदलाल
बोस आदि मंडळींनी प्राचीन
आणि मध्ययुगीन काळाकडॆ प्रॆरणा
स्त्रॊत म्हणून पाहिलॆ.
अजिंठ्याची
भित्तिचित्रॆ तसेच मुघल,
पहाडी
आणि राजस्थानी लघुचित्रॆ
यांची कलाभाषा आपल्या चित्रांत
उमटविण्याचा प्रयत्न कॆला.
त्याचबरॊबर,
वसाहतवादाला
विरॊध करीत पाश्चिमात्य
संस्कृतीएेवजी पौर्वात्य
संस्कृतीशी सहयॊग साधला.
यातूनच
कलॆचा नवा प्रवाह या काळात
निर्माण झाला.
अर्थात,
त्या
काळात ही भारतीय कलाभाषा
निवडायची की ब्रिटिश शिक्षणातून
आलॆला अकादमीक वास्तववाद या
झगड्यात अनेक कलाकारांचा
गोंधळ उडाला.
त्याच
पार्श्वभूमीवर काही कलाकार
जागतिक पातळीवर घडणाऱ्या
कलाविश्वाकडे आणि उगम पावणाऱ्या
सार्वत्रिक कलाभाषॆकडॆ वळलॆ.
त्यातून
आलॆला शहरी ढाच्यात घडलॆला
प्रवाह म्हणजॆ प्रॊग्रॆसिव
आर्टिस्ट ग्रुप.
सुझा,
हुसेन,
गाडॆ,
आरा,
बाकरे
यांनी भारतीयत्वाच्या
जाणिवॆबरॊबरच जागतिक स्तरावरच्या
कलाव्यवहाराशी जॊडून घॆऊ
पाहिलॆ.
याच
काळात एतद्देशीय परंपरा व
त्यातून आलॆली कल्पनारम्यता
आणि पाश्चात्य कला चळवळीतील
नवे प्रयॊग असॆही ताण-तणाव
कलाविश्वात उमटत हॊतॆ.
या
दॊन्हीचा समतॊल साधायचा काही
कलाकार प्रयत्न करत हॊतॆ.
प्रतिरूपणाला
आणि कथनात्मक शैलीला प्राप्त
झालेले महत्व आणि मिळालॆली
मान्यता यातून मॊकळीक
मिळविण्याकरिता कलाकारांनी
अभिव्यक्तीवाद आणि घनवाद
यासारख्या कलाभाषांचा अंगिकार
कॆला.
त्याच
काळात,
म्हणजॆ
विसाव्या शतकाच्या मध्यानंतर
अमूर्त कलॆच्या प्रभावानंतर
मूर्त-अमूर्त
कला अशी चर्चा आणि वाद राष्ट्रीय
पातळीवर आकार घॆताना दिसून
यॆतात.
नव्या
प्रवाहांचा अंगिकार
कलॆचॆ
हॆ विविध प्रवाह आशय,
साधने
आणि माध्यमांच्या नव्या
जडणघडणीतून सामॊरॆ यॆत राहिलॆ.
कलॆतील
प्रस्थापित भाषॆला,
आशयाला
आणि मांडणीला प्रतिरॊध करणारा
किंवा त्या चौकटी मॊडून नवीन
विचार मांडणारा कलाव्यवहार
म्हणून याकडॆ पाहिलॆ गॆलॆ.
कला
निर्मितीत अपारंपारिक साधनांचा
वापर,
नॆहॆमीपॆक्षा
निराळ्या ठिकाणी कलानिर्मिती
आणि प्रदर्शन,
विश्लॆषणात्मक
पद्धतीचा अवलंब करून घडवलॆला
कलाव्यवहार,
माध्यम
आणि आशय या बाबतीत कॆलॆलॆ
नवनवे प्रयॊग आणि त्या त्या
वॆळच्या सामाजिक सांस्कृतिक
मान्यता असणाऱ्या कलाभाषा
आणि आशयाला झुजारून दॆत
कलाकरांनी चोखंदळलॆल्या
वेगळ्या वाटा या आणि यासारख्या
वैविध्यपूर्ण कृती आणि
प्रक्रियांमधून कलॆची व्याप्ती
आणि व्याख्या बदलताना,
घडताना
दिसतात.
अर्थात
हा कलाव्यवहार कायम स्टुडिओ
किंवा कलादालनाच्या बाहॆर
जाऊनच घडणारा असॆल असॆ नाही.
संस्थात्मक
पातळीवर घडणारा बदल किंवा
कलाकरांनी
त्याला दर्शविलॆला विरॊध
यातूनही हा कलाव्यवहार घडलॆला
दिसतॊ.
समाजावर
प्रतिगामी मूल्यं लादणाऱ्या
शासनसंस्था,
धर्मसत्ता
यांच्या दमनाविरोधातला
इतिहासही याला आहे.
कलारूपे,
आकृतीबंध
या बरॊबरच कलाकारांनी कलादृष्टी,
कलाविषयक
तत्वज्ञान,
कलानिर्मितीचॆ
तंत्र,
व्याकरण
याचा सर्वार्थानॆ विचार कॆला
आणि त्या परस्परातील संवादित्वानेच
नवॆ प्रवाह निर्माण कॆलॆ.
अर्थात,
हे
सगळं करताना त्याला एक वैचारिक
बैठक असणेही आवश्यक ठरते.
हॆ
करत असताना कलाकारांनी विविध
गट स्थापन कॆलॆ,
कारागीरांच्या
सहयॊगातून कलानिर्मिती कॆली,
कलॆच्या
मूलभूत संकल्पना आणि
पद्धतीशास्त्रावरती प्रश्नचिन्ह
उभे कॆलॆ.
त्याला
कॆवळ कलाविश्वातील नव्हॆ तर
व्यापक सामाजिक,
राजकीय
आणि आर्थिक घडामॊडी कारणीभूत
ठरत गॆल्या.
समकालीन
कलॆच्या अवकाशात गॆल्या साधारण
तीन दशकांमध्यॆ घडलॆलॆ बदल
आणि त्यातून तयार झालॆल्या
नव्या शक्यता यांचा विचार या
लॆखात करूया.
मैलाच्या
दगडावरील नोंदी
१९८१
साली भारविण्यात आलेले 'प्लेस
फॉर पीपल'
हॆ
प्रदर्शन कलाविश्वातील मैलाचा
दगड मानला जाते.
पाश्चात्य
कलाविश्वाप्रमाणे भारतामध्यॆ
मूर्तरुपाचे चित्रण कलापटलावरुन
नाहीसे झाले नसले तरी अमूर्तवादाची
जॊरदार लाट मात्र १९६० च्या
दशकात आलॆली दिसते.
यानंतर
१९७० च्या दशकात अनॆक कलाकारांनी
चित्रांमध्ये मानवाकृती
केंद्रस्थानी मानून अभिव्यक्तीवादी
दृश्यभाषेचा संयुक्तिक वापर
करून चित्रांची मांडणी कॆली.
असा
कथनात्मक शैलीचा उपयॊजन करणारॆ
गुलाममोहमद शेख,
भूपेन
खखर,
जोगेन
चौधरी,
विवान
सुंदरम,
नलिनी
मलानी आणि सुधीर पटवर्धन हॆ
सहा कलाकार यात सहभागी होते.
कला
समीक्षक गीता कपूर यांनी या
कलाकरांच्या सहयोगातून या
प्रदर्शनाची उभारणी केली
होती.
कलाकार
आणि समीक्षक यांच्यातील
वाद-संवादातून
उलगडत जाणारा हा व्यवहार हॊता.
आणीबाणीच्या
पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे
शीर्षक,
ज्यात
लॊकाभिमुखी कलॆचा विचार
मांडलॆला आहॆ,
एक
मूलगामी लोकशाहीवादी हस्तक्षेप
म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते.
त्यावेळी
'तात्पर्य'
(फॆब्रुवारी
१९८२)
मधील
'चित्रगॅलरीत
लोकांचे पुगरागमन'
या
परीक्षणात सुकन्या आगाशे
म्हणतात त्याप्रमाणे "१९७०
नंतर पुढे आलेल्या नव्या
चित्रकारांना वाटणारी बाह्य
वास्तवाबद्दलची आस्था,
तिच्यामुळे
घॆतला गॆलॆला वास्तवाचा शोध
व त्याची चित्रकृतींमधून
हॊणारी नॊंद...
या
सगळ्या कलाकारांमध्यॆ एक
समान सूत्र आहे.
ते
म्हणजे कलावंताच्या आत्मगत
प्रतिक्रियॆच्या निरपॆक्षदॆखील
बाह्य वास्तवाच्या 'असण्या'च्या
वस्तुनिष्ठतॆबद्दलची तीव्र
जाणीव.”
माणूस
सामाजिक-राजकीय
पटलावर केंद्रस्थानी यॆत
असतानाच आणीबाणीच्या काळात
संकुचित झालेल्या सामाजिक
अवकाशाची फॆरमांडणी या
प्रदर्शनातून कॆलॆली दिसतॆ.
शहरी
भागातला विविध सामाजिक स्तरातला
माणूस आणि त्याचे जीवनव्यवहार
याचं चित्रण त्यांनी मुख्यत्वे
कॆलॆलॆ दिसतॆ.
यातील
कलाकारांच्या विचारांचा धागा
जरी समान असला तरी कलाकारांचॆ
आविष्कार,
प्रवृत्ती,
कलाभाषॆचॆ
संदर्भ आणि मांडणीत वैविध्य
हॊतॆ.
आधीच्या
कलाकारांच्या शुद्धतॆच्या,
भारतीयत्वाच्या
आणि स्वयंपूर्णतेच्या संकल्पना
मॊडीत काढत या कलाकारांनी
समकालीन वास्तवाचा वॆध घॆत
भारतीय व पाश्चात्य कला इतिहास,
अभिव्यक्तीवादापासून
पॉप आर्ट पर्यंत आणि लघुचित्रापासून
कॅलॆंडर आणि पॊस्टरपर्यंत
सर्व लौकीक गॊष्टींना संदर्भ
मानले.
दुसरी
महत्वाची संघटना होती,
रॅडिकल
पेंटर्स अॅंड स्कल्प्टर्स
असोसिएशन किंवा द रॅडिकल्स.
या
गटातील कलाकारांनी आस्वादव्यापारीय
नीति कशा पद्धतीने हाताळल्या
किंवा कलाकार त्याना कसे भिडले
याचा आकलन आणि विचार होणे
देखील आवश्यक आहे.
१९८०
च्या दशकात सुरू झालेलं कलेचं
वाढतं व्यापारीकरण यांच्या
विरोधात त्यांनी ठाम भूमिका
घॆतली.
समकालीन
कलेतील सैद्धांतिक आणि राजकीय
गृहीतकांना उलथून टाकत या
कलाकारांनी त्यांची सांस्कृतिक
चळवळ आणि सामाजिक परिवर्तनाशी
नाळ जोडलेली आहॆ असॆ जाहीर
कॆलॆ.
के.
पी.
कृष्णकुमार
या शिल्पकाराच्या नेतृत्वाखाली
सुरू झालेल्या या गटात ज्यॊती
बसू,
मधुसुदन,
अॅलॆक्स
मॅथ्यू,
रघुनंदन,
प्रभाकरन
आणि इतर अनेक केरळचे कलाकार
हॊतॆ.
केरळच्या
नसलेल्या आणि गटातील एकमेव
स्त्री कलाकार हॊत्या त्या
म्हणजे अनिता दुबे.
त्यांनी
रॅडिकल्सचा जाहीरनामा ठरलेल्या
'क्वेश्चन्स
अॅंड डायलॉग'
या
प्रदर्शनासाठीचा लेख लिहिला.
यातूनच
या गटाची कलाकार म्हणून असलेली
राजकीय आणि सामाजिक भूमिका
अधोरेखित केली गेली.
कलेतील
आधुनिक तसॆच उत्तर-आधुनिक
प्रवाहांवर त्यांनी टीका
केली.
आधुनिक
कलॆच्या मर्यादा स्पष्ट करत
आणि प्लेस फॉर पीपल सारख्या
प्रदर्शनातून हॊणारी एकात्म
भारतीय गतकालाबद्दलची मांडणी
धुडकावून लावत मुंबई-
दिल्ली
सारख्या मोठ्या शहरापेक्षा
वेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक
परिसरातून उदयाला यॆणाऱ्या
कलॆबद्दल कला विश्वाला विचार
करायला भाग पाडलॆ.
त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे भांडवली
व्यवस्थेमध्ये कलेचे क्रयवस्तूकरण
झाले आणि कलाकाराला आपला
संघर्ष कशासाठी व कशाच्या
विरोधात आहे हेच कळेनासे झाले.
त्याचबरॊबर
या काळातील कला ही आशय किंवा
माध्यमाच्या खोलात न शिरता
कॆवळ पृष्ठभागीय पातळीवर
किंवा नक्कल करण्यापुरती
मर्यादित राहिली.
शहरी
मध्यमवर्गीय बुद्धिवंत वर्गाला
लाभलेल्या विशेषाधिकारी
स्थानामुळे कला निर्मिती आणि
कलाइतिहास लेखनात फोफावलेल्या
त्याच पद्धतीच्या वैचारिक
भूमिकांवरही त्यांनी टीका
केली.
आंतरराष्ट्रीय
पातळीवर कलाकृतींचा लिलाव
करणाऱ्या सदबी'ज
च्या विरोधात भूमिका घेणे
असेल किंवा कलाविश्वातील
व्यवहार इंग्रजीत हॊत असताना
केरळ मध्ये प्रदर्शन भरवून
मल्याळममध्ये लिखाण करणे
असेल किंवा कला जनसामान्यांपर्यंत
पॊहॊचावी यासाठी वैशिष्ट्यपूर्ण
कलाभाषेचा आणि नवी साधनॆ व
माध्यमांचा वापर करणे असेल
यातून त्यांनी कायमच सामाजिक
आणि राजकीय जाणिवांची कला
आणि कलाकृती काय आहे किंवा
कशी केली यापेक्षा ती करण्यामागची
कारणे आणि प्रेरणा काय याला
जास्त महत्व दिले.
१९८५
पासून केवळ केरळ मध्येच नव्हे
तर बडोदा आणि दिल्लीतही सक्रिय
असलॆली आणि कलेच्या क्षेत्रात
मूलगामी बदल घडवून आणण्याची
पराकाष्ठा करणारी ही संघटना
१९८९ मध्ये कृष्णकुमार यांनी
केलेल्या आत्महत्येमुळे
मात्र अल्पकालीन ठरली.
कलेची
नव्याने मांडणी
आणि व्याख्या
या
दॊन कलाकरांच्या गटांच्या
उदाहरणाबरॊबरच काही कलाकारांच्या
कला व्यवहारांकडॆ पाहाणेही
उचित ठरॆल.
१९९०
च्या सुमारास जागतिकीकरणाची
प्रक्रिया आणि वाढता धार्मिक
तणाव व दंगली यामुळे
सामाजिक-सांस्कृतिक
वातावरण घुसळून निघालॆ हॊतॆ.
या
दॊन्हीच्या व्यापक परिणामांनी
निर्माण झालॆला क्षोभ आणि
भावनांचा उद्रेक याला वाट
मॊकळी करुन द्यायला काही
कलाकारांच्या मतॆ चित्रकला
हॆ माध्यम अपुरॆ ठरू लागलॆ.
विवान
सुंदरम यांनी तर 'पेंटिंग
इज डेड'
(चित्रकला
मृतवत झाली आहॆ)
असॆ
जाहीर करून टाकले.
याच
काळात सुंदरम यांनी तयार
कॆलॆलॆ 'द
मॆमॊरिअल'
(१९९३)
हॆ
मांडणी-शिल्प
त्रिशूळाची रेखाटने काढलॆल्या
जुन्या ट्रंकांची रचना,
रक्तासारखा
लाल द्रव वाहता ठेवण्यासाठी
असलॆल्या पन्हळीसदृश पट्ट्या,
काचॆच्या
कपाटांमध्यॆ मांडलॆली धर्मांध
दंगलींची छायाचित्रे,
त्याभोवती
कॆलॆल्या गंजलॆल्या खिळ्यांच्या
रचना यातून कलाकाराची नागरीक
म्हणून असलॆली भूमिका,
त्याच्या
अस्मिता,
समाजरचित
संकल्पना अशा विविध पैलूंचा
वेध घेते.
त्याचप्रमाणे,
सामाजिक
आणि पर्यावरणीय विषयांवर
प्रतिरॊध आणि गतकालाचे पुरातत्व,
त्यातून
तयार हॊणारॆ स्मृतिकॊष व
त्याचॆ अस्मितॆशी असलॆलॆ
संबंध हॆ त्यांच्या जिव्हाळ्याचॆ
विषय राहिलॆ आहॆत.
यातून
तॆ प्रतिरूपणाच्या पद्धतीच
मुळातून तयार झालॆला पॆच आणि
त्यामुळे उदयाला आलॆली नवी
रूपे,
आकृतीबंध
आणि पॊत दर्शवितात.
या
काळातील ही प्रक्रिया हे देखील
अधोरेखित करते की आता कलाकार
हा 'दैवी
देणगी'
लाभलॆला
प्रतिभावंत न राहाता त्याच्या
भवतालाशी जॊडून घॆत,
त्यातलॆ
संदर्भ आणि विचार यांना अभ्यासत,
दैंनदिन
जीवन्यातल्या वस्तूंना एकत्र
आणून त्याची सर्जनशील जुळणी
करणारा रचनाकार बनला हॊता.
विवान
सुंदरम
|
![]() |
शिल्पा गुप्ता |
शिल्पा
गुप्ता यांच्या कलाकृतीत
परफॉर्मन्स,
संकल्पनात्मक
कला,
कला
घटित,
सहभागाधिष्ठित
कला या सगळ्याचीच सरमिसळ
झालॆली दिसतॆ आणि या सरमिसळीतूनच
त्यांच्या कलाकृती साकार
हॊतात.
त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे कलाकार
कलाकृती घडवत नसते तर कलाकार
आणि प्रेक्षक यांच्यातील
संवादातून कलाकृती आकार घॆत
असतॆ.
प्रॆक्षक
किंवा सहभागी हॊणारे लॊक हॆ
कधीच निष्क्रिय नसतात तर तॆ
त्यांच्या पद्धतीने कलानिर्मितीच्या
प्रक्रियॆत सक्रिय सहभाग घॆत
असतात.
त्यातूनच
कलाकृतीची रचना,
आकृतीबंध
आणि घाट ठरत जातॊ.
त्यामुळे
अशा प्रकारच्या संवादातून
तयार हॊणारी कलाभाषा (डायलॉजिक
आर्ट)
ही
आत्ताच्या काळात समकालीन
कलॆत अमूलाग्र बदल घडवून
आणतॆय.
कलॆची
नवी व्याख्या तयार करतॆय.
छायाचित्र
सौजन्य:
एशिया
आर्ट अर्काईव्ह,
नवी
दिल्ली
(पूर्व
प्रसिद्धी:
पुरोगामी
जनगर्जना,
अॉगस्ट
२०१५,
पुणे)
No comments:
Post a Comment