रंग - नाट्य


रंग. त्यांचा आस्वादव्यापार. रंगांच्या असंख्य छटा. रंगांचीही एक दुनिया असते.
रंग तटस्थ नसतात आणि निरागस ही…
त्यांचे अर्थ अनेकविध आणि
'
अनर्थ'ही…
त्यातून
उभं राहातं राजकारण
.
सांस्कृतिक. भाषिक. प्रादेशिक. धार्मिक. जातीय. वर्गीय. यातून ते व्यक्त होत राहातं. अनुभवलं जातं. लादलं जातं.
आणि
मग प्रश्न उभा ठाकतो की तुम्ही आम्ही खरंच किती असतो आणि उरतोबहुसांस्कृतिक
,
आधुनिक, कॉस्मोपोलिटनइत्यादि इत्यादि?


सौजन्य: आसक्त, पुणे

ही माझी आसक्तचं एफ वन / वन झिरो फ़ाइव्ह पाहिल्यानंतरची, खरंतर नाटकानंतरची पहिली प्रतिक्रिया. पण नंतरही हे नाटक आणि त्याचं दृश्यरूप मन:पटलावर उमटत राहिलं ते वेगवेगळ्या कारणांनी

आशुतोष पोतदार लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित 'एफ वन / वन झिरो फ़ाइव्ह' हे नाटक 'आसक्त'च्या टीमनी सुबकपणे उभे केले आहेआशयघन संहिता असलेल्या या नाटकाची सुरुवात ही समाजाचा सांस्कृतिक भाषिक  इतिहास, त्यातले बारकावे, बहुभाषिक वास्तव आणि त्यातून निर्माण होणारे कंगोरे दाखवतं. मुख्य पात्रं, सागर आणि मुमु, यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून प्रेक्षक त्याला सामोरे जातातएका आधुनिक, उच्चभ्रू जोडप्याभोवती ही कथा फिरत राहते. कॉस्मोपोलिटन सोसायटीमध्ये राहणाऱ्या, कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या, स्वत:चं स्वातंत्र्य जपणाऱ्या आणि इतरांचं स्वातंत्र्य राखणाऱ्या अशा 'आजच्या' जोडप्याची ही कथा. आपल्या फ्लॅटचं नूतनीकरण करताना हिरवा रंग द्यायचं ठरवल्यानंतर एक प्रचंड वादळ उठतं.'बाहेरून' आलेल्या रंगाऱ्याशी झालेल्या अर्धवट (वि)संवादातून ते तयार होतंएका आधुनिक समाजाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या  या जोडप्याच्या आयुष्यातलं हे वादळ आधुनिकतेच्या विविधांगी प्रवाहांचंच खरंतर द्योतक आहे. आधुनिकतेनी दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य, विवेकवाद इत्यादि मूल्यं आपल्या जाणीवे-नेणीवेत खरंच उतरली आहेत का? की त्याच आधुनिकतेतून जन्मलेल्या तुटलेपण, परात्मभाव, परंपरेपासूनचा अलगपणा, पारंपारिकतेचा झुंडशाही प्रवृत्ती करत असलेला स्वार्थी वापर हे आज कुठेतरी वरचढ होत आहे? भाषिक प्रांतरचना, प्रांतवाद आणि अस्मितेचं राजकारण ही देखील याच आधुनिकतेची अपत्ये. यावरही भाष्य करत हे नाटक त्याच्या गाभ्यात दडलेल्या  विसंगती बाहेर काढायचा प्रयत्न करतेरंगाऱ्याचे भावविश्व, समूहाच्या प्रेरणा, समकालीन मृषावादाचे (अॅब्सर्डीटी) नाटकातील प्रतिबिंब आपल्या भोवतालीच्या वास्तव छटा अधिक गडद करते. रंगमंचावर विविध भाषांमध्ये घडणारे संवाद आपल्याला आपल्या बहुभाषिक वास्तवाची जाणीव करून देतात पण त्याच बरोबर त्यात दडलेल्या आणि वारंवार उफाळून येणाऱ्या अस्मितांची जाणीव करून देतात. आधुनिकतेनी दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य, घर नावाची सुरक्षित जागाजोडप्याचं खासगी आयुष्य, तिथे त्यांनी केलेली रंगाची निवड हे सगळं अचानक सार्वजनिक पटलावर उभं राहतं आणि त्या दोन्हीतल्या सीमा रेषा पुसट करतंत्यात त्यांचे शेजारी, समाजातील विविध घटक आणि गट निर्णायक भूमिका बजावतातत्यात मग त्या जोडप्याच्या नात्यातील गुंतागुंत आणि तडजोडी या सगळ्या कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर अधिक बाहेर येतात. पण असंही घडतं हे सगळं नाटकात थोडं उशिराने येतं आणि काही वेगवान घटना घडून ते थोडं अकस्मात थांबतं

 
सौजन्य: आसक्त, पुणे

या नाटकाची मला सर्वात भावलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे दिग्दर्शक आणि नेपथ्यकार यांची सौंदर्यदृष्टी. नाटक अर्थातच रंग, रंगांचे अर्थ, त्यांचं सांस्कृतिक राजकारण आणि धर्मकारण या मुद्दयांच्या भोवती गुंफलेलं असलं तरी ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही. ते विविध अंगांनी प्रत्यक्ष सादरीकरणात उतरतं. उदाहरणार्थ नाटकातील सागर, मुख्य पात्रांपैकी एक, हा इंटेरीअर डिझाइनर आहे. आणि तो रंगांच्या राजकारणापलीकडे जाऊन त्याच्या आस्वादव्यापाराविषयी भाष्य करतो. त्याचे मनोव्यापार, त्याच्या जाणीवा या जीवनातल्या रंगांच्या तरल छटांमधून उमलणाऱ्या अंतरंगाविषयी बोलतात. दुसरा पैलू म्हणजे नाटकाचं नेपथ्य जे फारच प्रभावी ठरतं. नाटकाचा एकूणच बाज अर्थातच प्रायोगिक आहे त्यात हे उठून दिसतं. रंगमंचावर काळा, पांढरा आणि करड्याच्या काही छटा सोडल्यास दुसरा कुठलाच रंग त्या दीड तासात दिसत नाही. रंगमंचावरील पात्रं, कथानक आणि संवाद हे एका विशिष्ट रंगाभोवती फिरत असले तरी प्रेक्षकांच्या दृकसंवेदना रंगमंचावरची 'रंगहीनता' टिपत राहतात. रंगमंचव्यवस्थेतही मिनिमॅलिझमचा सुरेख वापर केलेला दिसतो. मिनिमॅलिझमचा वापर हाही त्या आधुनिकतेचाच एक आविष्कारवस्तूविषय मांडण्यासाठी केवळ अत्यावश्यक बाबींचा केलेला वापर आणि हे करताना त्यातील प्रत्येक गोष्ट ही अनेक पदर उलगडून सांगणारी ठरते. आणि केवळ एवढंच नव्हे तर कलाकार देखील काळ्या पांढऱ्या छटांच्या पोषाखात वावरताना दिसतात. यात परिणामकारी भर घालतात त्या रंगमंचामागील पडद्यावरील बदलत्या प्रतिमा. त्याही करड्या रंगांच्या छटांच्यामाणसाच्या आयुष्यातून रंगच काढून टाकले तर? रंग हे मी इथे रूपकात्मक वापरतेयअर्थात, रंग या नाटकीय अनुभूतीमध्ये  रूपक म्हणून ही येतं आणि वास्तव म्हणून हीकारण एखादा विशिष्ट रंग हा एखादं सामान्य आयुष्य घुसळवून टाकणारा ठरू शकतो. ज्याला आपण बहुसांस्कृतिक बहुभाषिक समाज म्हणतो त्यातल्या या खाचाखोचा मग अशा प्रसंगी टोकदारपणे जाणवू लागतात.

सौजन्य: आसक्त, पुणे
बहुसांस्कृतिकतेपासून सुरु झालेला हा नाटकाचा प्रवास मात्र शेवटी वस्तुनिष्ठतेकडे येऊन थांबतो. घराला 'हिरवा' रंग देण्यावरून उठलेलं काहूर, झालेला गैरसमज, समाजातील काही घटकांनी उठवलेलं रान या सगळ्याला तोंड देत ही वस्तुनिष्ठता उभी राहते. आणि नाटकातला रंगारी आणि मुख्य स्त्री पात्र, मुमु, परस्परांच्या भूमिकेत शिरून हे शेवटच्या प्रसंगात घडवून आणतात. पण यामुळे नाटककाराच्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम तयार होतो. यातलं नक्की काय नाटककाराला म्हणायचं आहे. नाटकाच्या सुरुवातीला नसणारी वस्तुनिष्ठता शेवटाला प्रभावी करण्यासाठी येते की काय? त्याचबरोबर जात, भाषा, प्रांत, धर्म, राजकारण, परंपरा यासारख्या अनेक मुद्दयांचा उहापोह करण्याच्या नादात नक्की कशाबद्दल काय भूमिका आहे, याची स्पष्टता येत नाही. दुसरा असाच मुद्दा आहे तो म्हणजे जोडप्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर घालवलेला वेळ आणि त्यातले तपशील यातून नक्की काय साधायचा प्रयत्न केला आहे हे स्पष्ट होत नाही. सुरुवातीचा बराच काळ व्यापणारे आठवणींचे प्रसंग, पूर्वजांचा व्यवसाय, पाककौशल्याचे नमुने आणि स्वभाव विशेषापर्यंतचे बारकावे आणि नंतर समाजातल्या झुंडशाही प्रवृत्तींनी केलेली दादागिरी यांचा परस्पर संबंध लावणारा धागा नेमका कोणता ते स्पष्टपणे उलगडत नाहीआणि नाटक जरी जात, वर्ग, धर्म, प्रांतवाद या मुद्दयांना हात घालत त्यावर चिकित्सक टिप्पणी करत असलं तरी त्यात काही वेळा साचेबद्धपणा येतो. खास करून काही विशिष्ट पात्रांच्या बाबतीतएका ठराविक सामाजिक स्तरातून येणाऱ्या स्त्रिया दूषित दृष्टीकोन तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. कामवाली बाई, शेजारीण, आई या साऱ्या भूमिका तृप्ती खामकर एकीकडे अतिशय कसदार अभिनयातून उभ्या करतेबडबड करणारी, खोचक प्रश्न विचारणारी आणि भोचकपणा करणारी गुजराती शेजारीण असेल किंवा काहीशी वेडसर वाटणारी, गूढ वागणारी घरकाम करणारी बाई असेल. या अशा अतिशय बेंगरूळ वाटणाऱ्या पण अतिशय चलाख असणाऱ्या बाईची ही प्रतिमा मूळ संहितेमध्ये तशी येते, दिग्दर्शकाकडून तशी बनते की कलाकाराकडून, नक्की कोणत्या टप्प्यावर हे घडते हे पाहणेही इष्ट ठरेलदुसरीकडे आजच्या समाजामध्ये असलेली दुही, शतखंडित वास्तव, भयकुलता यांच्या मागे दडलेल्या वास्तवाचा शोध घेण्यात, त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्यात हे पुरेसं पडत नाही. रंगाचं राजकारण असेल, सांस्कृतिक ठोकशाही असेल किंवा उत्तरेकडून आलेल्या रंगाऱ्याबद्दलचे पूर्वग्रह असतील, त्यामागचं, अधिक खोलवरचं असं सामाजिक आर्थिक वास्तवाचा शोध घेणं हे जास्त अर्थपूर्ण बनायला कदाचित मदतकारक ठरलं असतं

नाटकाचं सादरीकरण पूर्णपणे प्रायोगिक आहे म्हणजे अगदी कलाकारांनी विंगेत जाता रंगमंचाच्या दोन्ही बाजूला मागे बसून राहण्यापर्यंत. क्वचित पथ-नाट्याची आठवण करून देणाऱ्या या प्रयोगशील सादरीकरणात कोरसचा वापर देखील प्रभावी केलाय मात्र कोरसच्या काही हालचालींत काही वेळा यांत्रिकता आणि एकसुरीपणा जाणवतो.  ही प्रयोगशीलता कधी कधी मनाचा ठाव घेते तर कधी कधी कर्कश्य ठरते. नाटकासाठी वापरलेला आकृतिबंध नाविन्यपूर्ण असून त्यात शारीरिक हालचालींवर भर देण्यात आलाय. इथे एका अर्थी त्याचं सुलभीकरण केलंय ही चांगली गोष्ट आहे. ही शैली समकालीन असली तरी या संहितेसाठी किंवा एकंदरच आपल्याकडच्या संवाद-वाही नाटकांमध्ये अशा प्रकारच्या आकृतीबंधाचा वापर करावा का, का करावा आणि केला तर तो कसा करावा याची कारणमीमांसा होणं मला आवश्यक वाटतं. त्यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे हे नाटक प्रेक्षकांपर्यंत खरंच कितपत पोहोचू शकत याचाही विचार होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या प्रकारच्या आकृतिबंधासाठी आवश्यक अशा अभिनयशैली विकसित झाल्या आहेत का, असाही एक दुय्यम मुद्दा आहे. संहितेची गरज, त्याला साजेसा आकृतिबंध आणि त्यानुरूप अभिनयाची जाण यांचा अधिक मेळ घातला असता तर त्यातील योग्य ते मुद्दे अधिक प्रभावीपणे पोहोचले असते. 



(पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, मे २०१५, पुणे)




2 comments:

  1. नाटक।त येणारी वस्तुनिष्ठता म्हणजे काय? ते कळले नाही. प्रसंग सांगता येऊ शकेल काय?

    ReplyDelete
  2. नाटक बघ म्हणजे कळेल :)
    बाकी सांगते भेटलास की...

    ReplyDelete